---Advertisement---

अशोक चव्हाण यांनी घेतली मराठीतून शपथ

By team
On: April 7, 2024 10:30 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी मराठीतून राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व अशोक चव्हाण यांच्यासह ६ जणांना संसद भवनात शपथ दिली.

नड्डा हे गुजरातमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणाऱ्यांमध्ये नड्डा व चव्हाण यांच्याशिवाय चुन्नीलाल गरासिया (राजस्थान), अनिल कुमार यादव मंडाडी (तेलंगणा), सुष्मिता देव व मोहम्मत नदीमुल हक (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. राज्यसभा सभापती कार्यालयाने या शपथविधी कार्यक्रमाची छायाचित्रे ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!