ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मंगळवारी यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन १९९५ पासून सुरुवात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!