---Advertisement---

बापरे : नववीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार

By team
On: January 31, 2024 10:10 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला आहे. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली होती. गेले काही दिवस दोघांमधील वाद सुरू होता.

दरम्यान, जखमी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी दप्तरातून कोयता आणला होता. सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच थेट वार केला,

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!