---Advertisement---

नक्षली हल्ल्यात ४ जवान शहीद

By team
On: January 31, 2024 9:29 AM
Follow Us:
---Advertisement---

रायपुर : वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील सुकमा व बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागात सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांबरोबर मंगळवारी चकमक झाली. त्यामध्ये तीन सीआरपीएफ जवान शहीद तर १४ जवान जखमी झाले, सीआरपीएफची नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी कोब्रा ही विशेष तुकडी असून, त्यातील दोन जवानांचा शहिदांमध्ये समावेश आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी टेकालगुदेम गावाजवळ नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. टेकालगुदेम येथे सीआरपीएफच्या जवानांनी एक नवा तळ स्थापन करून नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यावेळी जोनागुडा- अलिगुडा या गावांच्या नजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन सीआरपीएफ जवान शहीद झाले. तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!