---Advertisement---

अटलजींच्या विचारावरच आजही देशाची वाटचाल,अटल प्रतिष्ठानच्यावतीने अक्कलकोट येथे विविध कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.२६ : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यासाठी मोलाचे होते. त्यांच्या विचारावरच आजही देशाची वाटचाल सुरू आहे,असे प्रतिपादन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांनी केले. अक्कलकोट येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठान अक्कलकोट यांच्यावतीने भव्य आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, ई-श्रम कार्ड मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हे सर्व शिबीर जनतेसाठी मोफत ठेवण्यात आले होते.पुढे बोलताना स्वामी म्हणाले, अटल प्रतिष्ठानच्यावतीने जनतेसाठी घेण्यात येत असलेले उपक्रम जनतेसाठी फायद्याचे असून त्याचा उपयोग गरजूंनी करून घ्यावा. अटलजींनी आपल्या आयुष्यात भारतातील वंचित आणि पीडित घटकासाठी मोठे कार्य केले आहे. यामुळे अटल प्रतिष्ठान वतीने सुरुवात केलेल्या उपक्रमाचे उपेक्षित घटकास उपयुक्त ठरणार आहे.

प्रारंभी शिबिराचे उदघाटन माजी तालुकाध्यक्ष स्वामी,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, ऋतुराज राठोड, शबाब कोरबू, हिरेमठ यांच्या उपस्थितीत पार पडले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, अटल प्रतिष्ठानचा हा पहिला कार्यक्रम आम्ही अटलजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सुरुवात करीत आहोत.त्यांच्या समग्र विचारांना डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात शेकडो लोकांनी आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी आणि ई – श्रम कार्ड योजनेचा लाभ घेतला.या कार्यक्रमासाठी राहुल वाडे, अजय साखरे, धनराज पाटील, महादेव बिराजदार, विशाल बावडे, बसवराज स्वामी, प्रसन्न गवंडी आदींनी परिश्रम घेतले. त्याप्रसंगी ऋषी लोणारी, प्रशांत कलशेट्टी, अमोल गराड, विश्वजीत हिरेमठ, हिरियाल, गुरू हडपद, अमर कलशेट्टी, राजू अचलेर, बंडय्या स्वामी, प्रमोद मोरे, ओंकार वाघमारे, राज मद्रीकर, पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!