---Advertisement---

आ.प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला

By team
On: March 22, 2024 10:44 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या पंढरपूर तालुक्यात गावभेट दौऱ्यावर असताना गुरुवारी (दि.२१) रात्री सरकोली येथे त्या पोहचल्या असता काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आ. शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा हल्ला मराठा आंदोलकांच्या आडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना आ.शिंदे यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आ.प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या गावभेट दौऱ्यावर आहेत. त्यांना गुरुवारी उशिरा काँग्रेसकडून उमेदवारीही जाहीर झाली आहे. दरम्यान, त्या गुरुवारी (दि.२१ पंढरपूर तालुक्यात गावभेट दौऱ्याव असताना रात्री उशिरा सरकोल या गावी पोहचल्या. त्यावेळी काह लोकांनी घोषणाबाजी करत आ.शिं यांच्या गाडीला घेराव घातला. त्यातील काही कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांच्य गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शां राहण्याचे आवाहन केले. मात्र, ते ऐकूप् घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळ आक्रमक झालेल्या आ.शिंदे यांनी सद कार्यकर्त्यांना खडसावलेही. या घटनेनंतर आ. शिंदे यांन माध्यमांशी बोलताना सदर हल् हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल असल्याचा आरोप केला. मराट आंदोलकांच्या आडून भाजप कृत्य करत असून अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नसल्याचेही त्य म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!