ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार, तुमच्या खिशावरही होऊ शकतो थेट परिणाम

दिल्ली : २०२२ हे वर्ष लवकरच संपणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो. त्याचबरोबर येत्या वर्षभरात तुम्हाला काही नवीन बदलांनाही सामोरे जावे लागू शकते. हे बदल क्रेडिट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन मोदी यांचा संघर्षमय जीवन प्रवास.. वाचा सविस्तर

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज…

वाचनाने साहित्यिक घडला जातो, अक्कलकोटमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन,…

अक्कलकोट, दि.३० : जीवनामध्ये साहित्य असले म्हणजे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, साहित्य टिकविण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनाने साहित्यिक घडला जातो, समाजाला साहित्यिकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अक्कलकोट सारख्या ठिकाणी साहित्याची…

ब्राझीलला तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकून देणारे महान खेळाडू पेले यांनी घेतला जगाचा निरोप

दिल्ली : क्रीडाविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाने त्रस्त असलेले पेले काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पेले यांच्या निधनाने…

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करत नाही; भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या…

नागपूर, दि. २९ डिसेंबर - औद्योगिकदृष्ट्या अव्वल महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात आहे. महिलांवरील…

हिवाळी अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांनी केली अजित पवार, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत…

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांचं कामकाज सुरू आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देत, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या…

देशासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे, भारतासह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशासाठी पुन्हा चिंताजनक बातमी आहे. भारतासह जगभरात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने देशासाठी पुढील 40 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण जानेवारीमध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू शकतात असा दावा केला जात आहे. आरोग्य…

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – मुख्यमंत्री…

नागपूर, दि. २८ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन…

होटगी रोड ‘जैसे थे’ ठेवून बोरामणी विमानतळाचा विकास करा ; अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने घेतली…

अक्कलकोट ,दि.२८ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळ 'जैसे थे' ठेवून एका बाजूने विमान सेवा सुरू करावी आणि बोरामणी विमानतळाचा विकास तातडीने करावा,अशी मागणी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक…

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.२८ : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते.…
Don`t copy text!