ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नूतन पोलीस निरीक्षकांचा दणका : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

सोलापूर : प्रतिनिधी

मोहोळचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस निरीक्षकाचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसायांवर चांगलेच लक्ष केंद्रित केल्यामुळे अनेक – व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

४ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मोहोळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये – बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या – हेतूने साठा करून ठेवलेला – मोठा दारू साठा जप्त केला आहे. त्यामध्ये तब्बल बारा – लाख रुपयांच्या दारू साठ्यासह – एक आयशर टेम्पो आणि एक पिकप असा एकूण २६ लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. ही कारवाई पाटकूल ते टाकळी सिकंदर जाणाऱ्या रोडलगत असलेल्या एम.एस. ई.बी. ऑफिस पाठीमागे शेतात करण्यात आली.

या कारवाईमध्ये इंम्पेरियल ब्ल्यु, रॉयल स्टँग, लँडन प्राईड, मॅकडॉल नंबर वन, रॉयल क्लासिक, हॅण्डल व्हाईट कंपनीच्या दारुचे बॉक्ससह २६ लाख १४ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत प्रदिप परमेश्वर पवार (वय २४, रा. तांबोळे, ता. मोहोळ) याच्या विरोधात मोहोळचे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल कुबेर यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!