ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन ; गजाननाला घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था

देशासह राज्यात आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाही गणरायाचे थाटात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्रींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश आणि वर्षा निवासस्थानी कर्तव्य बजावणारे पोलिस व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका ट्विटद्वारे सांगितले की, राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेव एवढेच मागणे श्री गजाननाच्या चरणी मागितले. तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे, तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरीही त्या शेतकऱ्यांचा पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरू झाला असून सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांना हा सण सुखाचा जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री गणेशाच्या आशीर्वादाने राज्यातील महायुती सरकार पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत आहे. राज्यात अनेक उद्योग आले असून त्यातून हजारो हातांना रोजगार मिळणार आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात झाल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!