---Advertisement---

बापरे : पहाटेच्या सुमारास मुंबईतील झोपड्यांना भीषण आग

By team
On: January 29, 2024 3:18 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक मोठ्या शहरात आगीच्या नियमित घटना घडत आहे. नुकतेच आज सोमवारी मुंबईच्या मालाडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड त्रिवेणीनगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. झोपडपट्टीतील घरांना आग लागल्यानंतर परिसरातच एकच खळबळ उडाली. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

मालडमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील त्रिवेणीनगर या झोपडपट्टीला मोठी आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!