---Advertisement---

बापरे : सहावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By team
On: December 7, 2023 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पुणे येथील शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतील सरावादरम्यान थकल्यामुळे मैदानाबाहेर बाजूला जाऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. देव किसन दुबे (वय १२,रा. अण्णापूर) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे अण्णापूर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ मंगळवारी सकाळी १० वाजता देव दुबे हा येथील जिल्हा परिषद शाळेत आला होता. शाळेत क्रीडा स्पर्धेचा सराव चालू असताना थकल्यामुळे तो मैदानाबाहेर जावून बसला होता. तो तसाच जागेवरच कोसळल्याची माहिती मुलांनी शिक्षकांना दिली. या वेळी शिक्षकांनी त्याला उपचारासाठी अण्णापूर येथील प्राथमिक आरोग्य कें द्रात आणि त्यानंतर शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत भागूजी रभाजी दुबे, (रा. अण्णापूर, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिसांत खबर दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!