---Advertisement---

बारामतीत EVM ठेवलेल्या गोडाऊनचे कॅमेरा बंद ; पवार गटाच्या नेत्याचा आरोप

By team
On: May 13, 2024 3:19 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून दुसरीकडे बारामतीत EVM ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी यासंदभार्त तक्रार देखील दाखल केली आहे. त्यांनीच हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. त्यानंतर आता गोडाऊनमधील सीसीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव हे कॅमेरे बंद होते असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत बोलतांना लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, ”ज्या गोडाऊनमध्ये EVM मशीन ठेवलेले आहे. त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहेत. यामागे काही षडयंत्र असल्याची शंका आहे. संबंधित विभागाच्या RO यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. गोडाऊनमध्ये तंत्रज्ञ उपलब्ध नाही. तर आमच्या लोकांना तिथे जाऊन गोडाऊन दाखवले जात नाही”,असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.

पुढे ते म्हणाले, ”पोलिसही आम्हाला काहीच सूचना नाही असे सांगतात. माझा प्रशासनाला प्रश्न आहे की हे नेमके काय सुरू आहे?” असा सवाल खाबिया यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये सात मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. यंदा बारामतीच्या लढतीकडे विशेष लक्ष होते. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर इथे पवार वि पवार अशी लढाई रंगली होती.

दरम्यान, याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!