ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज ठाकरेंनी बांधला सत्तेत बसवायचा चंग ; 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या काही महिन्यात आगामी विधानसभा निवडणूक येणार असल्याने सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली असतांना नुकतेच मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर पडण्याची व सर्वच जागेवर निवडणूक लढविणार असल्याच्या संकल्प केला आहे. आगामी विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधला आहे. त्यासाठीच 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. ते मुंबईमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच निवडणुकीची तयारी म्हणऊन 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंबईमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा गुरुवारी पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, ”येणाऱ्या विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्ट घडणार म्हणजे घडणारच आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण तयारीला लागलो आहोत. ऐन निवडणुकीच्या वेळी कोणाशी युती होईल असा कोणताही विचार मनात आणू नका. विधानसभेत मनसे 225 ते 250 जागा लढवणार”, असे म्हणत राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे. तसेच 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला आहे. राज्यातील मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. मात्र राज्यात सध्या लाडकी बहीण, लाडका भाऊवरून राजकारण सुरू आहे. मात्र हे लाडकी बहीण, भाऊ एकत्र असते तर दोन पक्ष आज एकत्र राहिले असते. योजना काढत आहेत मात्र सरकारकडे त्यासाठी पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत”, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!