कुरनूर: अलीकडच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी होत चाललेला आहे. खेडेगावात आजही मुली शिक्षणापासून वंचित राहताना दिसतात योग्य ते शिक्षण त्यांना मिळत नाही ग्रामीण भागात आजही चूल आणि मूल या दोन गोष्टी पुरतेच मुलींचे आयुष्य मर्यादित राहिलेला आहे. सोनोग्राफी चे प्रमाण वाढलेला आहे. आणि याकडे उच्चशिक्षित सुद्धा वळताना दिसत आहेत. त्यामुळे मुलींचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
तीच आई,तीच मावशी, तीच बायको, तीच आत्या,तीच काकू, मग मुलगी का नको?असे अनेक प्रश्न अनुउत्तरीत आहेत. समाजामध्ये मुलगी नको म्हणून मुलींचा द्वेष पसरण्यावर लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी केलं.ते दुधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ हा कार्यक्रम साजरा करण्यातआला.त्यावेळी बोलत होत्या.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की गर्भलिंग तपासणी करणाऱ्या पालकांवर व डॉक्टर वर कठोर कारवाई केली पाहिजे. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या पणतीची वात आहे. त्यामुळे मुलींचा सर्वजण सन्मान केला पाहिजे. शिक्षण दिले पाहिजे तर देशाचा विकास होणार आहे असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे संकल्पना दिलीप स्वामी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. सोलापूर यांनी घेतले होते. यावेळी अभियानाचे अंतर्गत एक किंवा दोन मुली असणाऱ्या माता भगिनींना फेटा बांधून,भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरेखा जवळकर जि. प. सोलापूर जयश्री पोतदार व श्रीशैल माशाळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मंजुनाथ पाटील, आडत व भुसार व्यापरी असोशीएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, बसवराज हौदे, सैदप्पा झळक्की, लक्ष्मीकांत पोतदार, हणमंत कलशेट्टी, राजु लकाबशेट्टी यांच्यासह दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.