---Advertisement---

विठ्ठल-रुक्मिणीला आजवरचे सर्वात मोठे दान, भाविकाने केले पावणे दोन कोटींचे सोन्याचे दागिने अर्पण

Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी भाविकाने कोट्यवधींचे दान अर्पण केले आहे. आज वसंत पंचमी असून विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याच निमित्ताने एका भाविकाने विठुरायाला तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहे. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते. मात्र दागिने अर्पण करणाऱ्या भाविकाने नाव न जाहीर करण्याची अट घातली आहे.

विठ्ठल मंदिरात आज दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटा माटात संपन्न होणार आहे. या निमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे. बंगळुरू इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे.

पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. या शिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा याचा समावेश आहे. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!