---Advertisement---

भाजपला मोठा धक्का : धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा

By team
On: April 12, 2024 9:53 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, गुरुवारी ता. ११ धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

हा भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला होता. मात्र, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपने आपलं वर्चस्व ठेवलं. आता हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवारांनी भाकरी फिरवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!