ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बिग ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपची चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरु होती. आज अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ते आज भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते तसेच गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची चर्चा गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण व काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अशोक चव्हाण हे भाजपामध्ये सोबत जाणार असल्याची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे अशोक चव्हाण यांनी भेट घेऊन राजीनामा दिल्या असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तर ते भाजपामध्ये प्रवेश करण्याची ही चर्चा आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून काँग्रेस पक्षामध्ये मोठे खिंडार यामुळे पडणार आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद ग्रामपंचायत महापालिका हे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी कसोटी लागणार आहे. यासह आणखी काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याची देखील चर्चा राज्यात जोर धरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!