---Advertisement---

मोठी बातमी : आ.बच्चू कडू अंतरवाली सराटीकडे रवाना : आंदोलनाला देणार पाठींबा

By team
On: January 20, 2024 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करीत असतांना त्यांनी २६ जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. या मागणीकडे सरकार तोडगा काढत नसल्याने आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अमरावतीमधून अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.

“मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. सरकारने धोरणात्मक सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत, त्यांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्या दुरुस्त्या केल्या. आता ज्या काही धोरणात्मक अधिसूचना काढायला पाहिजे असे जरांगे पाटलांना वाटते त्या लगेच काढून घ्याव्या, त्यामुळे समाजाचे भलं होईल,” असे आमदार बच्चू कडू म्हणालेत.

तसेच “राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पाऊल मागे यावं लागेल, त्यासोबत जरांगे पाटलांना सुद्धा मागं यावे लागेल, व समाजाचं भलं कसं होईल यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत, दिलेला वेळ भरपूर आहे, 54 लाख जातीचे दाखले जे द्यायचे आहे त्यांला थोडा वेळ लागेल.. असे बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!