---Advertisement---

मोठी बातमी : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

By team
On: July 12, 2024 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचा सुपरहिट चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय आज अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होता. पण तत्पूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे त्याला आता या सोहळ्याला हजर राहता येणार नाही.

‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. केवळ अक्षयच नाही तर ‘सरफिरा’च्या टीममधील आणखी काही जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!