मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून यात ठाकरे गट देखील मागे नाही. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाले. या घटनेमध्ये पायटल आणि त्याचा असिस्टंट सुखरुप आहेत. अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉफ्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
सुषमा अंधारे गुरूवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या. याठिकाणची सभा आटपून त्या आज बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. हेलिकॉप्टरने त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली.
सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँड होत होते. तेव्हा अचानक हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, पायलट हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी अचानक मोठा आवाज होतो आणि हेलिकॉप्टर कोसळते. ही घटना कशामुळे घडली याच कारण अद्याप समोर आले नाही. पण या घटनेमध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणारा पायलट आणि त्याचा असिस्टंट सुखरूप आहे.