सोलापूर : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे. विशेषतः सोलापूर महानगरपालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी निवडणूक झाली होती. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ५२ जागांची आवश्यकता असताना भाजपने तब्बल 87 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपने सोलापुरात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि माकप यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र ही आघाडी मतदारांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
सोलापूर महापालिकेतील अंतिम चित्र
भाजप – 87 जागा
एमआयएम – 8 जागा
शिवसेना (शिंदे गट) – 4 जागा
काँग्रेस – 1 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 1
राष्ट्रवादी (शरद पवार गट – ०
शिवसेना (ठाकरे गट) – ०
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना खातेही उघडता न आल्याने हा निकाल त्यांच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपसाठी हा विजय संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव सिद्ध करणारा ठरला आहे. सोलापुरातील या दणदणीत यशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.