---Advertisement---

उजनी धरणात बोट बुडाली : सात प्रवासी बेपत्ता !

By team
On: May 23, 2024 9:16 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवाशी वाहतूक करणारी बोट मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बुडाली. या बोटीमध्ये सात प्रवाशी प्रवास करत होते. ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे निघाली होती.

उजनी धरणाच्या बॅक वॉटर परीसरात मंगळवार दि.२१ रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे ही प्रवासी बोट उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे या बोटीतून सात प्रवाशी प्रवास करत होते. यामध्ये सात जण बुडाल्याचे समजते. यातून बोटीच्या चालकाने पोहत आपला जीव वाचवला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे ७ प्रवासी आणि बोट चालक असे एकुण ८ जण प्रवास करत होते. घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशी (ता. इंदापूर) या ठिकाणी आले आहेत. घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलिस दलातील कर्मचारी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी पोचले असून, मदत व बचावकार्य सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!