मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही शहरात होणाऱ्या टीकेला बॅनरबाजीच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम सुरु असतांना आता स्टॅडअॅप कॅामेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यरचना असलेली कविता एका शोमध्ये सादर केली होती. यानंतर राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामराने केलेल्या कवितेवर टीकेची झोड उठवली. ज्या ठिकाणी कविता सादर करण्यात आली होती तो स्टडिओ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. यानंतर राज्यभरात कामरेने शिंदेंवर केलेल्या विडंबमानत्मक कवितेच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर पुण्यात शिवसेनेकडून बॅनरबाजी करत कुणाला कामराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यातून गौरव करत शिवसेनेच्या वतीने पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये “बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी हाथो में भगवा आए हाए”असे म्हणत बॅनर लावण्यात आला आहे. शहरातील टिळक रस्त्यावर हे बॅनर झळकले आहेत. “ठाण्याची रिक्षा सुसाट” अशा आशयाचा बॅनर लावण्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या कवितेनंतर शिवसेनेकडून पुण्यात बॅनरबाजी करत प्रत्युतर दिले आहे.
बॅनरवर रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे दिसत आहेत. तर मागे बसलेला कॉमन मॅन अस चित्र देखील बॅनरवर रेखाटण्यात आले आहे. या बॅनरजी मोठी चर्चा पुण्यात होत आहे.