---Advertisement---

उपमुख्यमंत्री समोर आमदाराची दादागिरी : पोलिसाच्या कानशिलात लगावली !

By team
On: January 6, 2024 10:32 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

भाजपचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील ससून रुग्णालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच दादागिरी करत पोलिसाच्या कानशिलात लगावल्याने प्रचंड गोंधळ झाला. याप्रकरणी पुणे शहर पोलीस काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले असून, आ. कांबळेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीय वॉर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.

ससून रुग्णालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. तृतीयपंथीय वॉर्डाच्या उद्घाटनादरम्यान हा प्रकार घडला. ससून रुग्णालयाच्या कोनशिलेवर नाव नसल्याने भाजपचे आमदार कांबळे यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती अजित पवार यांना देण्यात आली आहे. या प्रकरणात अजित पवार हे आमदार सुनील कांबळे यांच्याबाबत गंभीर भूमिका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!