ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्यावसायिकांना फटका : एलपीजी सिलिंडरचे दर वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे त. तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी एलपीजी ते एटीएफ दराची नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २५.५० रुपयांनी महागणार आहे. कोलकात्यात ही वाढ २४ रुपये आणि चेन्नईमध्ये २३.५० रुपये आहे.

एलपीजीच्या दरामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह संपूर्ण देशात वाढ झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून घरगुती (१४.२ किलो) एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलेला दिलासा कायम होता. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९. ५० रुपयांऐवजी १७९५ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत आता १८८७ रुपयांऐवजी १९११ रुपये आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा दर आता १७४९ रुपये झाला असून चेन्नईत १९६० रुपये झाला HP GAS आहे. आग्रामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८१७.५ रुपयांऐवजी १८४३ रुपयांना मिळणार आहे. जयपूरमध्ये आता १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १८१८ रुपयांना मिळणार आहे. लखनौमध्ये तो आता १८८३ रुपयांऐवजी १९०९ रुपये झाला आहे. अहमदाबादमध्ये १८१६ रुपये झाला आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे. घरगुती सिलिंडरच्या किमती ३० ऑगस्ट २०२३ रोजी शेवटच्या बदलण्यात आल्या होत्या. १ मार्च २०२३ रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर ११०३ रुपये होता. यानंतर ते एकाच वेळी २०० रुपयांनी स्वस्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!