---Advertisement---

७ मोटारसायकलीसह मुद्देमाल जप्त : सोलापुरात कारवाई

By team
On: March 2, 2024 11:03 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्राम उर्फ रामा बसप्पा वाघमारे (वय-३६, रा. कोनापूरे चाळ, फॉरेस्ट, सोलापूर) या सराईत चोरट्याकडून ७ मोटारसायकलींसह ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ७० फूट रोड परिसरातील महेश भिमनपल्ली यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. याबाबत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलीस चोरट्याचा शोध घेत असताना एक ३० वर्षीय इसम चोरीची मोटारसायकल घेऊन बाळे ब्रीजखाली येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला.

प्रथमतः त्याच्याकडून १ मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने आणखी ६ मोटारसायकल चोरल्याचे सांगत त्या काढून दिल्या. गुन्हे प्रकटी करण पथकाचे शंकर धायगुडे, प्रवीण चुंगे, अजय पाडवी, ऐय्याज बागलकोटे, कृष्णा चहुरे, विनोद व्हटकर, विनोद पुजारी, अमोल खरटमल, नितीन मोरे, अर्जुन गायकवाड, शशीकांत दराडे, सचिनकुमार लवटे, अजय चव्हाण, सुधाकर माने, पंकज घाडगे, आतिश पाटील, तौसिफ शेख, भिमदे यांनी ही कामगिरी पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!