---Advertisement---

…पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल – नाना पटोले

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. नाना पटोले राहुल गांधी यांना भेटण्यापुर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या “सामना”तुन भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सामना” या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण “सामना” मी वाचत नाही, अशा शब्दात पटोले यांनी टोला लगावला. टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलतना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“सामना” या मुखपत्रावर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, कारण मी सामना वाचत नाही. कोणी काय टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार एकदा करावा लागेल, असा इशारा पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवेसेनेला दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!