विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन वेळेत कपात

सोलापूर दि. २८ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यातही रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन वेळेत कपात करण्यात आले आहे. भाविकांना केवळ सकाळी ०७ ते संध्याकाळी ०७ वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी संकेतस्थळावरुन वेळ निश्चित करावी, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी … Read more

परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ निमित्ताने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या … Read more

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे. वाढत्या कोरोना संकटामुळे सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्यातील ठाकरे सरकारने केले आहे. सध्या राज्यातील मोठ्या … Read more

ब्रह्मकुमारीज संस्थेच्या दादी हृदयमोहिनी यांचे निधन

माऊंटअबु : ब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईच्या सैफी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. दादी हृदयमोहिनी यांच्या पार्थीवावर शनिवारी संस्थेच्या माउंट अबू येथील ज्ञानसरोवर अकादमीत अंत्यसंस्कार केले जाईल. दादी हृदयमोहिनी यांचा जन्म १९२८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव शोथा होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच … Read more

वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने महाशिवरात्री उत्साहात

अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने मोठया भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला. वटवृक्ष मंदीरात स्वामींची मुर्ती ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरच विराजमान आहे. त्यामुळे मंदीरातील महाशिवरात्रीस अनन्य
साधारण महत्व आहे.पहाटे ५ च्या काकड आरतीनंतर महाशिवरात्रीचा उपवास असल्याने वटवृक्ष मंदीर गाभाऱ्यातील शिवलिंगास पुरोहीत मोहन पुजारी व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते जलधारा व बेलपत्री वाहून महाशिवरात्री आराधनेची सुरूवात करण्यात आली.

यानंतर सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती तसेच दर गुरुवारी रात्री आठ वाजता होणारा पालखी सोहळा महाशिवरात्रीचा उपवास व शिव आराधनेमुळे संपन्न झाला नाही. रात्री दहा ते बारा या वेळेत महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार महाशिवरात्री रोजी भाविकांना ठराविक अंतराने  दर्शनास सोडण्यात आले. भाविकांनीही मंदिरात आल्यानंतर मास्क वापरून ठराविक अंतराने सुरक्षितपणे दर्शन घेऊन मंदीर समितीस व प्रसासनास सहकार्य करताना निदर्शनास आले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मंदीर समितीच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.

याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढल्याने मानवी रक्ताची गरज ओळखून मंदीर समितीच्यावतीने सद्या दर पौर्णिमा, उत्सव व मंदीरातील गर्दीचा काळ पाहून वेळोवेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून भाविकही या रक्तदान शिबीरास वेळोवेळी उत्स्फुर्त प्रतिसाद देत असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी हेडगेवार रक्तपेढीचे शिबीर व्यवस्थापक सुनिल हरहरे, संतोष पराणे अनंता कुतवाल, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, जयसिंह इंगळे इत्यादी उपस्थित होते.

Read more

महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनचर्येत बदल 

अक्कलकोट, दि.१० : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवार दि. ११ मार्च माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिरातील पूजा विधि अभिषेक बंदच आहेत.प्रशासनाच्या सूचनेनुसार महाशिवरात्री रोजी भाविकांना ठराविक अंतराने दर्शनास सोडण्यात येईल.तरी भाविकांनी मंदिरात आल्यानंतर ठराविक अंतराने सुरक्षितपणे दर्शन घेऊन माघारी जावे,असे आवाहन … Read more

‘गणेश मंडळांनी तन्मयतेने समाजकार्य सुरु ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी करोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुगम झाले. करोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी यापुढेही तन्मयतेने काम सुरु ठेवल्यास बाप्पाच्या कृपेने यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे साजरा करता येईल, असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; दिवंगत भय्यूजी महाराज, दिग्दर्शक केदार शिंदे यांसह १० जणांना पुरस्कार

भारताच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व दक्षिणेकडील चेन्नम्मा या महिला राज्यकर्त्यांचे कार्य दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी देवींची आठवण करून देणारे आहे. अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचेप्रमाणेच त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. सागा फिल्म्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित … Read more

वटवृक्ष मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साध्या पध्दतीने साजरा

अक्कलकोट,दि.२८ :  अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात परंतू अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुरोहीत मंदार पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली. सकाळी ८:३०  वाजता पारंपरिक  देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता … Read more

Don`t copy text!