---Advertisement---

ब्रह्मकुमारीज संस्थेच्या दादी हृदयमोहिनी यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

माऊंटअबु : ब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईच्या सैफी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. दादी हृदयमोहिनी यांच्या पार्थीवावर शनिवारी संस्थेच्या माउंट अबू येथील ज्ञानसरोवर अकादमीत अंत्यसंस्कार केले जाईल.

दादी हृदयमोहिनी यांचा जन्म १९२८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव शोथा होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच ब्रह्मा बाबा यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांना २७ मार्च २०२० रोजी संस्थेच्या तत्कालीन मुख्य प्रशासक १०४ वर्षीय राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आले होते.

दादी हृदयमोहिनींच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!