माळशिरसमध्ये माजी आ.सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय !

सोलापूर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी उत्साहात मतदान केले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान झाले, तर मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु झाली आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील … Read more

मोहोळ तालुक्यात मतदान यंत्रावरून संभ्रम; आयोगाचे स्पष्टीकरण

सोलापूर : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदान यंत्रांचा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापर झालेला नाही. ही … Read more

खडकाळ जमिनीवर उभे राहतेय हिरवे स्वप्न : सोलापुरातील शेतकऱ्यांचा जंगलनिर्मितीचा निर्धार

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे एक अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. खडकाळ आणि कोरड्या जमिनीवर जिथे पूर्वी केवळ झुडपे वाढत होती, तिथे आज शेतकरी प्रमोद इंगळे यांच्या पुढाकारातून जंगल उभे राहत आहे. रोपे जिवंत राहावीत यासाठी इंगळे झाडांच्या मुळांभोवती सुक्या उसाचे अवशेष पसरवत आहेत. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो … Read more

मे डे’ कॉल का नाही? अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न”

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या … Read more

‘फुकट प्रसिद्धीसाठी भडक वक्तव्ये’; शहाजीबापू पाटलांचे खडेबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था  सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फुकट प्रसिद्धीसाठी सध्या भडक बोलण्याचा उद्योग सुरू असून, अजित पवारांच्या अपघाताचे कुणीही राजकीय भांडवल करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) … Read more

शेगावात भक्तीचा महासागर; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ७५०हून अधिक दिंड्यांची हजेरी !

शेगाव :  वृत्तसंस्था  संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. दिंड्या येण्याचा ओघ अद्याप सुरूच असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील … Read more

मोहोळमध्ये ईव्हीएमवरून मध्यरात्री गदारोळ; हॉटेलमध्ये राखीव मशीन्स आढळल्याचा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरालगत … Read more

१५ दिवसांत सोनं २३ हजारांनी, चांदी १.३८ लाखांनी घसरली

जळगाव :  वृत्तसंस्था शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या मालिकेला अखेर ब्रेक लागला असून, गेल्या आठवड्यापासून सोने व चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खालीच आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत सोने २३ हजार रुपये, तर चांदी १ लाख ३८ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी चढ्याभावात गुंतवणूक केलेल्यांमध्ये … Read more

अजित पवार विमान अपघात: सीआयडीने केली खासगी सचिवांची चौकशी सुरु !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ धावपट्टीवर विमान कोसळले आणि यात पाच जणांचा मृत्यू झाला. … Read more

व्हॅलेंटाइन वीक: भावना व्यक्त करण्याची संधी आणि आठवड्याचे प्रत्येक दिवसाचे अर्थ

फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण व्हॅलेंटाइन वीकच्या तयारीला लागतात. कारण हा आठवडा आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. व्हॅलेंटाइन वीक म्हणजे फक्त गिफ्ट्स देणं-घेणं नाही, तर आपल्या मनातल्या भावना पार्टनरपर्यंत पोहोचवण्याचा एक खास मार्ग आहे. 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा प्रेमाचा आठवडा आपल्या भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी उत्तम ठरतो. याच काळात … Read more