ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. 26  : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबामधील सुमारे 1 लाख 97 हजार लोक विस्थापित झाले आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला…

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २६ :- पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी…

महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय

अलिबाग, जि.रायगड, दि. 26  :- महाड तालुक्यातील तळीये गाव दि. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र आज चौथ्या दिवशी सकाळी बचावकार्य…

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे…

सांगली, दि. २६ : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित…

साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासोबत नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे…

मुंबई, दि. २५ : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. पुरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तत्काळ उपचार करतानाच त्यांना…

तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर,नारायण राणे, प्रवीण दरेकरांसह केला कोकणचा दौरा

मुंबई, 25 जुलै : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

बारामती दि. 25 : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य…

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई, दि. २५ : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले…

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव…

रत्नागिरी दि.  25 :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांकडून चिपळूण शहरातील नुकसानीची पाहणी

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि इतर नेते उपस्थित आहेत. तीन दिवसापूर्वी…
Don`t copy text!