बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे. यातच आता या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 9 डिसेंबर 2024 चा संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धाराशिवच्या वाशीमध्ये आरोपी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सोडून 6 आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले असून अनेक आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
याचदरम्यान या प्रकणातीला आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिवमधील वाशी शहरातील पारा चौक या ठिकाणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे साथीदार पोहोचले. त्या ठिकाणाहून स्कॉर्पिओ गाडी सोडून पळून जाताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. संतोष देशमुखांच्या हत्यानंतरच हे फुटेज आहे.