ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ६० तरुणांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पदवीधारसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ आज (दि.५) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील पदवीधरांनी महिन्याला ६१ हजार रुपये मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

६० तरुणांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये मिळणार

मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील ६० तरुणांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या फेलोंना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे” देखील म्हटले आहे.

प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव : CMO

निवड होणाऱ्या राज्यातील ६० तरुणांना एका वर्षासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. याद्वारे राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि त्यांच्या कल्पकतेचा, ताज्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा, यासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे, असेही सीईमओने म्हटले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ प्रक्रिया

कालावधी – १ वर्ष (१२ महिने)

वयोमर्यादा – २१ ते २६ वर्ष

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ – https://mahades.maharashtra.gov.in/home.do?lang=mr

अर्ज शुल्क – ५०० रुपये

पात्रता – कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह पदवी, 1 वर्षाचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान, आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक

निवड प्रक्रिया – तीन टप्पे (ऑनलाईन चाचणी, निबंध लेखन आणि मुलाखत)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group