---Advertisement---

मुख्यमंत्री फडणवीसांना किती वेतन मिळणार ?

By team
On: December 6, 2024 2:56 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

 

कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना महिन्याला 3.4 लाख रुपये वेतन मिळणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता ३.४ लाख रुपये प्रति महिना झाले आहे. राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत. यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत दिल्या जात आहेत.

 

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे सर्वाधिक वेतन आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ४.१० लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३.९० लाख रुपये मिळतात.

 

हरियाणा-बिहारसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन किती?

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना २.८८ लाख रुपये, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २.५५ लाख रुपये, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना २.३० लाख रुपये, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना २.२० लाख रुपये, २.१५ रुपये देण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाख, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा २.१० लाख रुपये मिळतात.

 

इच्छुकांना लागली मंत्रिपदाची आस

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचेच दुसरे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार १२ किंवा १३ डिसेंबर रोजी होईल, असे सांगितले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!