अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास येत्या सोमवार पासून प्रारंभ होत असून यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी म्हणजे दि.१० रोजी गंध मिरवणूक निघणार असून,११ जून रोजी दिवे (यात्रा) तर १२ जून रोजी जियारत असल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली यांनी दिली.
उरूस निमित्त दर्गा परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून उत्सव कालावधीत तिन्ही दिवस भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता अहमदनगर येथील सुप्रसिद्ध कव्वाल शाहिद अजमेरी निजामी यांचा कव्वालीचा कार्यक्रम मुजावर जमातचे तालुका अध्यक्ष मजहर मुजावर व डॉ. अरमान पटेल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.
यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी दर्गा ट्रस्टचे संस्थापक हाजी नसरोद्दीन मुतवल्ली,खलीलअहमद मुतवल्ली,सैपन मुजावर, माजिद गौर,इम्रान मुतवल्ली,मजहर मुजावर,मतीन पटेल, मुनीर मुजावर,अल्तमश घोळसगावकर, सत्तार बिराजदार,अस्लम बोरोटी, समीर मुजावर आदी परिश्रम घेत आहेत.