---Advertisement---

राहुल गांधीच्या भाषणा दरम्यान भाजप खासदारांचा गोंधळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदीना विचारले पाच प्रश्न

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : लोकसभेमध्ये आज धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्या नंतर राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत आलेल्या अनुभवां बाबत बोलण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी आरोप केला की, अग्निवीर योजना ही सैन्यदलावर थोपवण्यात आली असून ही कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. यानंतर राहुल गांधी हे उद्योगपती गौतम अदानी आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असलेल्या कथित सख्याच्या मुद्या कडे वळले. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला की, २०१४ पूर्वी श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर असलेले अदानी हे अवघ्या ९ वर्षात दुसऱ्या क्रमांकावर कसे काय आले? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर इतके मेहेरबान का आहेत असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत विचारला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या अहवाला बाबतचा आणि एलआयसी, एसबीआय सारख्या सरकारी, निमसरकारी संस्थांनी अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकी बाबतचा मुद्दा राहुल गांधी यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच प्रश्न विचारले.

खासदार राहुल गांधी यांनी विचारले हे पाच प्रश्न

• अदानी आणि तुम्ही एकत्र कितीवेळा दौऱ्यावर गेलात ?
• मोदी यांनी दौरा सुरू झाल्यानंतर कालांतराने अदानी किती वेळा त्या दौऱ्यात सामील झाले.
• मोदींनी ज्या देशांचा दौरा केला, त्यापैकी किती देशात अदानींचाही दौरा झाला.
• किती देशांमध्ये मोदी यांचा दौरा झाल्या नंतर लगेच अदानींना कंत्राटे मिळाले.
• अदानींनी भाजपला गेल्या वीस वर्षात किती पैसे दिलेत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!