---Advertisement---

काँग्रेसला धक्का.. १२४ पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

By team
On: November 2, 2024 5:37 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई  वृत्तसंस्था 

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री, सागर बांगला (मुंबई) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक व त्यांच्यासोबत काँग्रेसच्या १२४ पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केले.  त्या प्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण व आ. निरंजन डावखरे साहेब याच्या उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे बेलापूर विधानसभा प्रभारी शार्दुल कौशिक व माजी नगरसेवक राजू शिंदे यांचाही प्रवेश पार पडला. 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना सांगितले की, ‘भाजपा एक परिवार आहे आणि यात तुम्हा सर्वांचे स्वागत करत असताना मी तुम्हाला आश्वासित करतो की पक्ष संघटना संपूर्णपणे तुम्हा सर्वांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने उभी राहील.’ तसेच त्यांचे आभार व्यक्त करताना अनिल कौशिक यांनी नवी मुंबईत भाजपा अधिक बळकट करण्याची हमी दिली. सदर कार्यक्रमात नवी मुंबई भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष. रामचंद्र घरात ही उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!