---Advertisement---

काँग्रेस नेते शशी थरूर यांची “या” प्रकरणी निर्दोष मुक्तता

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल सात वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर आज न्याय मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची दिल्लीच्या राऊज एव्हन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. शशी थरूर यांना पहिल्यापासूनच न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, असे निकालानंतर थरूर यांचे वकिल विकास पहवा म्हणाले.

सुनंदा यांनी 2010 मध्ये काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता. 2014 साली दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप होता.

सरकारी बंगल्याचे नुतनीकरण चालू असल्याने सुनंदा पुष्कर आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर दोघे हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री असलेल्या शशी थरुर यांच्यावर भारतीय दंड संहिता 498-ए आणि 306 नुसार गुन्हा दाखल झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!