स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पूर्वीप्रमाणेच सातत्य ; वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक यांचे मनोगत
पुणे आकाशवाणीच्या व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार
अक्कलकोट प्रतिनिधी: येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्तीला स्मरत आज येथे येऊन मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन लाभलेले समाधान अतुलनीय व संस्मरणीय आहे. अनेक वर्षांनंतर स्वामी दर्शनाचा लाभ मिळाल्याने हे दर्शन माझ्या व माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत खास आहे.
मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांनी अत्यंत विनम्रभावे आमचे आदरातिथ्य केले. तसेच श्री स्वामी दर्शनाच्या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देऊन आमचा सन्मान केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची आज पुन्हा एकदा प्रचिती आली. एकंदरीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पूर्वीप्रमाणेच सातत्य असल्याचे मनोगत पुणे आकाशवाणीच्या व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.
त्या नुकत्याच आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गेल्या. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी मंदिर व्यवस्थापनातील सातत्य, शिस्त, स्वच्छता व प्रसन्न वातावरण पाहून वृत्तनिवेदिका स्वाती महाळंक आपले मनोगत व्यक्त करत होत्या.
यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल महेश इंगळे यांचाही स्वाती महाळंक व मारुती बावडे यांनी सत्कार करून इंगळे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रथमेश इंगळे, पत्रकार मारुती बावडे, मोहन चव्हाण, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ आदी उपस्थित होते.