ध्यास विश्वसार्ह बातमीचा

न्यायालयाचे कामकाज ठप्प : न्यायालय गेले पाण्यात

नंदुरबार : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाचा हाहाकार सुरु असतांना बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. अश्यात शहादा शहरात रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी शहादा न्यायालयाच्या आवारात शिरले. यामुळे संपूर्ण न्यायालय परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. सर्व न्यायालय व न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा न्यायालयाच्या समोर डोंगरगाव तलावातून आलेली पाटचारी वाहते. मोठा पाऊस आला तर या पाटचारीचे पाणी दरवर्षी न्यायालयात शिरते आणि कामकाज ठप्प होते. यंदाही या पाटचारिचे पाणी मोठ्या प्रमाणात न्यायलय परिसरात शिरल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या परिसरात सुमारे गुडघाभर पाणी साचले आहे. न्यायालयाची जुनी ईमारत खोलगट भागात असल्याने या न्यायालयाचे कामकाज चालत असलेल्या सर्व ईमारतींमध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे. पाटचारी शिवाय पाण्याचा निचरा नसल्यामुळे पाणी न्यायालयाच्या आवारात साचून आहे.

पाण्याचा योग्य निचरा नसल्याने तीन ते चार दिवस हे पाणी ईमारत व आवारात साचून राहते. परिणामी तोपर्यंत न्यायालयीन कामकाज ठप्प राहते अथवा तश्याच परिस्थितीत कामकाज चालवणे भाग पडते. कसेतरी पाण्याचा निचरा केला, तरी न्यायालय परिसर व सर्व इमारतीमध्ये कित्येक दिवस मोठ्या प्रमाणात चिखल व घाण, कचरा साचलेला राहत असल्याने आरोग्यही धोक्यात येते. सुदैवाने आज न्यालयाला मोहरमची सुटी असल्याने न्यालयाचे सुनावणीचे काम बंद होते. मात्र दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!