गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती करा, भाजप कार्यकर्त्यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
दुधनी : सर्वांचे लाडका, गणपती बप्पाचे आगमनास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रीम हौदाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते दौलत हौदे यांनी दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरवर्षी दुधनी शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, आनंदाने, भक्तिभावने साजरा केला जातो. शहरात लडक्या बाप्पाच्या आगमनाच्या नंतर दिड दिवसांपासुन गणेश विसर्जनाला सुरुवात होते. सद्या शहरात गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी एकही विहिर सुस्थीतीत नाहीत. शहरातील सर्वच विहिरींमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये मुख्यत; गांधी चौकातील सरकारी विहिरीत घरगुत्ती व सर्व मंडाळांच्या गणेश मुर्तींची विसर्जन केला जातो. सदर विहिरीत तळीरामांनी मद्याचे आणि पाण्याचे बॉटल, कचरा फेकुन दिली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी अस्वच्छ झाले आहे. त्या पाण्यात लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन करणं योग्य ठरणार नाही.
तरी दुधनी नगर परिषदेच्यावतीने त्वरीत गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रीम हौदाची व्यवस्था करुन शहरातील नागरिकांना सोय करुन द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी भाजप कार्यकर्ते दौलत हौदे, मडीवाळप्पा अल्लापूर बसवराज गुरूभेट्टी उपस्थित होते.