---Advertisement---

सोलापुरातील गुन्हेगार जाधव स्थानबध्द

By team
On: March 13, 2024 9:47 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील विविध भागात जबरी चोरी करणारा गुन्हेगार बुध्दघोष कीर्तीपाल जाधव (वय-२०, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) यास दि.१२ रोजी शहर पोलिसांनी स्थानबध्दतेची कारवाई केली. फौजदार चावडी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हेगार बुध्दघोष जाधव हा मागील काही वर्षापासून घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, मोटरसायकल चोरी करणे, घातक शस्त्रानिशी धमकावणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.

त्याच्याविरुध्द एकूण ४ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत. सन २०२३ मध्ये सीआरपीसी प्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी त्याची गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा उपायुक्त डॉ. दीपाली काळे, परिमंडळ उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्तद्वय प्रांजली सोनवणे, अशोक तोरडमल, ‘वपोनि’ द्वय सुनील दोरगे, दिलीप शिंदे, फौजदार वीरेंद्रसिंग बायस, पोहेकॉ विनायक संगमवर, हवालदार सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव आणि विशाल नवले यांनी कारवाई केल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!