ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दादांचा अपघात अपघात नाही, घातपात आहे” : रोहित पवारांचा धक्कादायक दावा VSR रेकॉर्डवर विवाद वाढवणार !

मुंबई : वृत्तसंस्था

बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गत २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर आता प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अपघातावर संशय व्यक्त करत म्हटले आहे की, “अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे.”

रोहित पवारांनी सोशल मीडियावर वाचकांसमोर धक्कादायक माहिती मांडली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अपघातातील विमानाचे रेकॉर्ड ठेवणारी VSR (VSR कंपनी) कंपनीच्या नोंदीमध्ये मोठी बनवाबनवी सुरू असल्याचा गंभीर संशय आहे. विमानाच्या एकूण ५००० तासांपैकी फक्त १८०० ते २००० तासांचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत; उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत. रोहित पवारांचा आरोप आहे की, या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी VSR ने करत असल्याची शक्यता आहे आणि चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे.

रोहित पवारांनी अधिक सांगितले की, विमानाच्या अपघाताच्या चौकशीसाठी केवळ पायलट रोहित सिंग यास बोलवले जाणे, आणि VSR कंपनीच्या मालकाचा भारतात उपस्थित असताना चौकशीत सहभाग न घेणे यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. त्यांनी DGCA आणि CID यंत्रणांमध्ये मिलीभगत असल्याचा शंका व्यक्त केला आहे.

“DGCA आणि VSR ची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद पाहता, अजित दादांची किंमत किती आहे हे लक्षात येते,” असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे या प्रकरणावर गांभीर्य दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणामुळे बारामती विमान अपघाताची चौकशी नव्या टप्प्यात येत असून, नागरिकांमध्येही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अपघातामागे खरी कारणे काय आहेत आणि आरोपी यंत्रणा कोण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!