---Advertisement---

विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !

By team
On: February 24, 2026 5:51 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर विरोधकांनी सरकारवर विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून त्याला धारेवर धरले.

आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप केला. तसेच मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना टोला लगावला. आदित्य ठाकरे म्हणाले, “पालिकेला अजून जाग आलेली नाही. शहरातील हवा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. सरकारने फक्त छापील उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी.”

त्यांनी मराठा आरक्षण आणि कर्जमाफीसारख्या निवडणूकपूर्व घोषणा अद्याप पूर्ण न झाल्याचा, तसेच लाडकी बहीण योजनेतून भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेता न नसल्याचे ऐतिहासिक मुद्दा उठवून, भाजप कोणाला घाबरत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, आदित्य ठाकरे यांनी अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली आणि पुण्यात कॉंग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांचा हा ठोस आक्रमक दबाव, सरकारसाठी निश्चितच मोठा आव्हान ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!