ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात असे म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह दाओसला गेले होते. चार दिवसांच्या या दाओस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत केली. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसारकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना चार्टड फ्लाईटने जाण्यात गैर काय असा सवाल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री शिंदे दावोस दौऱ्यात ७६ तासांमधील केवळ चार तास झोपल्याचाही त्यांनी दावा केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून टीका केली होती. त्याला शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

केसरकर म्हणाले की, भारतातील राज्यांनी अनेक असे निर्णय घेतले आहेत की त्यामुळे ही राज्य दिवाळखोर होणार आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करायचं की हिताचं राजकारण करायचं हे त्या त्या राज्याने ठरवायचं असतं, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि खर्चाची सरकार दरबारी सर्व नोंद असते. सरकारचं ऑडिट स्ट्रिक्ट असतं. ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असं बोलत असतात. असे ते म्हणाले.

याबरोबरच केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही केसरकर यांनी उत्तर दिले आहेत. त्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले, तेव्हा त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का? युवकांना मॅच्युरीटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे. थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडं शांत व्हा, असा सल्ला दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!