अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने नाताळच्या सुट्टीमुळे महाप्रसादा करिता होणाऱ्या गर्दीचे उत्कृष्ट नियोजन केल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान न्यासाकडून गेल्या १५ दिवसात गर्दीच्या काळात केलेल्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून प्रशंसा तर भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे. दुपारी व रात्रो उशिरापर्यंत भक्तांच्या सेवेत अन्नछत्र मंडळाकडून महाप्रसादा बरोबरच निवास, वाहनतळ, महाप्रसाद रांग, वयोवृद्ध माता भगिनी, दिव्यांग यांच्यासह ऑनलाई महाप्रसाद बुकिंग करणाऱ्यांना थेट महाप्रसादगृहात प्रवेश, हिरकणी कक्ष आदी व्यवस्थेबाबत दिलेले प्राधान्य क्रम, परिसरातील स्वच्छता या सह पदाधिकारी सेवेकरी सुरक्षारक्षक कर्मचारी यांचा गर्दीतील नम्रपणा या एकूणच सर्व नियोजाबाबत अन्नछत्र मंडळ हे अव्वल ठरले आहे. गत वर्षातील नाताळ सुट्टी, मार्गशीर्ष महिना, नववर्ष आरंभ यामुळे श्री क्षेत्र अक्कलकोटला श्रींच्या दर्शनासाठी गर्दीत वाढ झाली होती गेल्या १५ दिवसात सुमारे १५ लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
भक्तांनी तीर्थटणातून पर्यटनबाबत न्यासाच्या परिसरात दत्त मंदिर, स्वामींचा रथ यासह श्रीमंत कांतामतीराजे भोसले वाचनालय, अश्रयदात्यांचे कक्ष, स्वामी सदन- धान्य कोठार, सभागृह, कार्यालय, सिंहांनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्वामींची भव्य उभी ३० फुटी मुर्ती, दिपमाळा, वारूळातून प्रकटले परब्रम्ह, कपिला गाय, शिवस्मारक, श्री गणेश मंदिर इमारत, श्री शमी विघ्नेश गणपती मंदिर, श्री तुळजाभवानी माता मंदिर, हिरकणी कक्ष, दिव्यांग रुग्णांसाठी बग्गी, आऊटडोअर जीम, यात्री भवन, यात्री निवास, अतिथी निवास, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एटीएम, श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो उद्योन, जॉगिंग ट्रॅक, वाहन तळ, भक्तांची सोय, याबाबत तीर्थ क्षेत्र नगरीतील विविध मुख्य मार्गावर कटाऊटस् लाऊन स्वामीं भक्तांना सुलभ व्यवस्था होण्या कामी अन्नछत्र मंडळाकडून सोय केली.
अन्नछत्राचे उत्कृष्ट नियोजन – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने नाताळच्या सुट्टीमुळे महाप्रसादा करिता होणाऱ्या गर्दीचे उत्कृष्ट निवोजन केल्याने आम्ही भक्त समाधानी आहोत.– विशाल जालिंदर चव्हाण भिगवण- पुणे