अक्कलकोट, दि.१५ : शासन निर्णयाप्रमाणे दुधनी नगर परिषद अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप
केल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली.
प्रत्येक नगरपरिषदेस दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के निधी राखुन ठेवावा लागतो.त्यास अनुसरुन दुधनी नगरपरिषदेने सन २०२०-२१ या वर्षासाठी ५ टक्के निधी दिव्यांगासाठी राखून ठेवला होता.
सदर निधी वाटपासाठी नगरपरिषदेने फेब्रुवारी २०२१ मध्ये लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली होती. त्यात एकूण १६ अर्ज प्राप्त झाले होते व सर्व लाभार्थी पात्र ठरले.दुधनी नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीपैकी १६ दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ५५ हजार थेट दुधनी शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खातेत हस्तांतरण करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, नगरविकास शाखेचे सह आयुक्त अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी, अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडले.यासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीनअधिक्षक चिदानंद कोळी, लेखापाल विशाल चव्हाण आणि लिपिक सी. बी. पाटील ,शांतलिंग चिंचोळी यांनी प्रयत्न केले.