---Advertisement---

गोगांव येथे जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला.

वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे कोव्हिड १९ लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गोगांवचे उपसरपंच यांनी वरिष्ठ अधिकारी व डॉ.गजानन मारकड, डॉ. साधना पाटील यांच्याशी चर्चा करून वृध्द लोकांचे अडचणी मांडल्यावर त्यावर सकारात्मक चर्चा करून आज तीस लस उपलब्ध करून देण्यात आले.

गोगांव येथील अंगणवाडीमध्ये आज लसीकरण सुरुवात उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. लिंगराज नडगेरी,पर्यवेक्षक निलोफर नदाफ, आरोग्य सेविका अंबिका वळसंग, आशा वर्कस मधुमती गायकवाड, अंगणवाडी सेविका तेजाबाई गुरव, भाग्यश्री सोनकवडे आदी उपस्थित होते.यावेळी वृद्ध लोकांनी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!