मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

अजित पवार स्मारक व संग्रहालयाच्या ठिकाणी पवार कुटुंबात मतभेद !

By team
On: February 11, 2026 10:46 AM
Follow Us:
---Advertisement---

बारामती :  वृत्तसंस्था 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक आणि संग्रहालय कुठे उभारायचे यावर पवार कुटुंबात मतभिन्नता समोर आली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात स्मारक उभारण्याची चर्चा सुरू होती.

या संदर्भात शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली होती. प्राथमिक चर्चेत स्मारकाची रूपरेषा, ठिकाण आणि स्वरूप ठरले असले तरी, आता कुटुंबात मतभिन्नता स्पष्ट झाली आहे.

जय पवार यांचा आग्रह आहे की, अजित पवारांचे संग्रहालय पुणे शहरात असावे, तर स्मारक बारामतीत उभारावे. त्यांचा दावा आहे की, पुण्यात संग्रहालय उभारल्यास अधिक लोकांना अजित पवारांच्या कार्याची माहिती मिळेल आणि पुणे जिल्ह्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेता ही निर्णययोग्य ठरणार आहे. दुसरीकडे, पार्थ पवार यांचा असा आग्रह आहे की, स्मारक आणि संग्रहालय ही दोन्ही ठिकाणे बारामतीतच असावीत. त्यांचे म्हणणे आहे की, अजित पवारांचे राजकीय आणि सामाजिक कार्य बारामतीशी घट्ट जोडलेले असल्यामुळे एकाच ठिकाणी हे दोन्ही घटक उभारणे योग्य राहील.

मंगळवारी जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता शरद पवार, सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबीय यांचे निर्णय कसे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होणार आहे. यामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही नियोजन समितीची पहिली बैठक ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment