---Advertisement---

विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलनात प्रेरणादायी नृत्य आणि गायनाची मैफल

By team
On: February 11, 2026 1:31 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची संकल्पना प्रख्यात नृत्यांगना आणि टीव्ही ,चित्रपट कलाकार सुधा चंद्रन यांच्या आयुष्यावर आधारित होती. लहान वयामध्ये दुर्दैवाने १ पाय गमवावा लागलेल्या सुधाने आपल्या इच्छा प्रतिभा आणि चिकाटीने अडचणींवर मात करून नृत्यांगना होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सुमधुर गीतांच्या आणि नृत्याच्या माध्यमातून सुधाचा जीवन प्रवास दाखविण्यात आला. लक्ष्मी स्तोत्र, शिव तांडव यांवर शास्त्रीय नृत्याविष्कार यामध्ये सादर करण्यात आले तसेच छोटा बच्चा सारख्या गीतांनी प्री प्रायमरी च्या मुलांनी देखील बहार आणली. सूत्र संचालनात सृष्टी फुलारी, कार्तिकी आडवितोटे, सन्वि बिराजदार आणि देवयानी राजिमवाले यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

 

 

तसेच कमांडो कॅडेट फोर्स चे सज्जन इंगळे यांच्या प्रशिक्षणाखाली प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला मल्लखांब प्रेक्षकांना खूपच आवडला. ऑपरेशन सिंदूरवर आधारित नृत्यनाट्य आविष्कार दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना अर्पण करून विद्यार्थ्यांनी देश आणि लोकनेते यांची समृद्ध जाणीव दाखवून दिली.

संस्थाप्रमुख डॉ पुरुषोत्तम महाराज राजीमवाले, डॉ गिरिजादेवी राजीमवाले, नगराध्यक्ष श्री मिलनदादा कल्याणशेट्टी, संस्था सचिव नाना गायकवाड हे प्रमुख अतिथी होते. तसेच ऑस्ट्रिया, जर्मनी येथील मान्यवरही या कार्यक्रमात अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळा प्रमुख सौ गायत्री पारखे, अभिजित स्वामी, सूरज चव्हाण, निदा इंडिकर, आकांक्षा वाडे , सुलेखा हादीमणि, वैष्णवी जगताप, जावेद शेख, यांचे विशेष योगदान संमेलन यशस्वी करण्याकरिता लाभले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!